अहो… मला चिंचपेटी घडवा

ऐश्वर्या नारकर

सध्या इमिटेशन ज्वेलरीचा (Imitation jewelry) जमाना असला तरी पारंपरिक दागिने पाहिले की प्रत्येकीला असं वाटतं की हा दागिना आपल्याला अंगाखांद्यावर मिरवता आला पाहिजे. पूर्वी संस्थानकाळात राजघराण्यातील स्त्रिया दिवसभर केसातल्या खोप्यापासून पायातल्या जोडवीपर्यंत हरेक दागिना रोज घालायच्या. नऊवारीचा रूबाब आणि दागिन्यांचा थाट यामध्ये खुलणारं ते राजेशाही भारदस्त सौंदर्य काय वर्णावं. इतके वजनदार दागिने आता कुणी घालत नसलं तरी मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री ऐश्वर्या नारकर पारंपरिक दागिने घालण्याची हौस भागवून घेत आहे. स्वामिनी मालिकेत गोपिकाबाई पेशवे (Gopikabai Peshwa) साकारणाऱ्या ऐश्वर्याच्या अंगावर दागिन्यांना काहीच कमी नाही. पण या लेण्यांमधली चिंचपेटी ऐश्वर्याला जास्तच आवडली असून नवरा अविनाशकडून चिंचपेटी घडवून घ्यायला आवडेल असं तिने ठरवलं आहे.

स्वामिनी मालिकेच्या सेटवर गप्पा सुरू असताना ऐश्वर्याला जेव्हा एका मुलाखतीच्यावेळी विचारलं की गोपिकाबाई म्हणून तुझ्या अंगावर असलेल्या दागिन्यांपैकी तुला कोणत्या दागिन्यासाठी खऱ्या आयुष्यातील नवऱ्याकडे हट्ट करायला आवडेल. या प्रश्नावर मात्र ऐश्वर्या क्षणभर थांबली. मुळातच स्वामिनी ही मालिका पेशवेकालीन असल्याने त्या काळातील दागिने ऐश्वर्या यामालिकेत वापरत आहे. पेशवेकाळात खानदानी दागिना म्हणून बाजूबंद, तोडे, चिताक यासारखे दागिने असायचे. याच पंक्तितली चिंचपेटीही ऐश्वर्याने घातली आहे. मग काय, पेशवेकालीन दागिना घडवायचाच झाला तर मी अहोंच्याकडून चिंचपेटी घडवून घेईन असा फुल सिक्सरच टाकला ऐश्वर्याने. सेटवरच्या गप्पांचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तो अर्थातच ऐश्वर्याचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार अविनाश याच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यानेही ऐश्वर्याला चिंचपेटी घडवेन असे प्रॉमिस केले असल्याची खबरही पक्की आहे.

aishwarya narkar unseen photos: marathi celebrity aishwarya narkar unseen photos | Maharashtra Times Photogalleryगेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावर ऐतिहासिक मालिका दाखल झाल्या आहेत. ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई, स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतील जिजाऊ यासोबत स्वामिनी ही मालिकाही संध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत गोपिकाबाई पेशवे यांची करारी भूमिका साकारणारी ऐश्वर्या नारकर ऑनस्क्रीन नखशिखान्त दागिन्यांनी सजलेली दिसते. खरंतर ऐश्वर्याचा चेहरा सोज्वळ असल्यामुळे आजपर्यंत ती आपल्याला नेहमीच साध्या गृहिणीच्या रूपात दिसत आली आहे. त्यामुळे छान कॉटनच्या साड्या, पाठीवर रूळणारी लांबसडक वेणी असा तिचा लूक तिच्या चाहत्यांच्याही सवयीचा आहे. बरीच वर्षे छोट्या मोठ्या पडदयावरचा, रंगभूमीवर आपल्या आजूबाजूला दिसणारी स्त्री वठवणाऱ्या ऐश्वर्यालाही स्वामिनी मालिकेच्या शूटिंगसाठी दिवसभर भरजरी साडी आणि अंगभर दागिने घालून बसायला लागतं. या मालिकेत वापरण्यात आलेले दागिनेही वजनाला जड आहेत. त्यामुळे ऐश्वर्या गंमतीने म्हणते की दागिन्यांची हौस फिटणारा हा सगळा साजशृंगार आहे. पण दागिन्यांची सवयच आता मोडल्याने स्वामिनीच्या गोपिकांबाई करायचे ठरले तेव्हा लूक टेस्टच्यावेळीच हे सगळे दागिने घालावे लागणार हे मी स्वीकारले होते. गळ्यातल्या दागिन्यांचे वजन जास्त असले तरी त्यांचा त्रास होत नाही, पण मोठमोठे कानातले, केसातला खोपा यांच्याशी जुळवून घेणे हाच खूप मोठा टास्क आहे. मालिकेच्या निमित्ताने ऐश्वर्यालाही पारंपरिक दागिन्यांची नावं कळली, पेशवेकालीन स्त्रिया कोणते दागिने घालत होत्या, त्यांचे महत्त्व समजले.

लवकरच ऐश्वर्या आणि अविनाश दोघंही श्रीमंताघरची सून या नव्या मालिकेत एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत. या नव्या मालिकेत ते नवराबायको असून यापूर्वी महाश्वेता, लेक माझी लाडकी या मालिकांमध्येही पतीपत्नीच्या भूमिकेत होते. त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री मालिकेतही जुळून येत असल्याने श्री व सौ नारकर यांची वर्णी श्रीमंताघरची सून या मालिकेसाठी लागली आहे.

गेल्या आठवडयात नव्या मालिकेचे प्रोमो झळकले तेव्हा त्यामध्ये ऐश्वर्या नारकरला पाहून सोशल मीडियावर वेगळीच आवई उठली. ऐश्वर्या स्वामिनी मालिकेला रामराम ठोकून श्रीमंताघरच्या सूनेची सोशिक सासू होणार. मग स्वामिनी मालिका का सोडली, तिच्या जागी दुसरी कोण गोपिकाबाई होणार. त्यात दोन्ही चॅनेल वेगवेगळे असल्याने दोन भूमिका, दोन सेट ही कसरत कशी करणार असे अनेक प्रश्न ऐश्वर्याच्या कमेंट बॉक्समध्ये पडले होते. पण, नव्या भूमिकेत दिसले म्हणून जुनी भूमिका सोडलीच पाहिजे असे काही नाही असं म्हणत ऐश्वर्यानेही चर्चांना पूर्णविराम दिला. पण ही चर्चा थांबवत असताना सोशलमीडियावरील ट्रोलिंगबाबत ती खूपच नाराज झाली.प्रेक्षकांनी काहीही विचार न करता अंदाज लावून मत बनवण्यापेक्षा खरं काय ते जाणून घ्या असा गोपिकाबाईंच्या स्टाइलमध्ये सल्ला द्यायलाही ती विसरली नाही.

ही बातमी पण वाचा : एका लग्नाची वेगळी गोष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER