कंगनाचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; अहमदनगर शिवसेनेची धमकी

Ahmednagar Shiv Sena

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) शिवसेनेने (Shivsena) कंगनाचा (Kangana Ranaut) फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन केले. घोषणा दिल्या आणि शहरात कंगनाची कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.

मुंबई मनपाने कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर काल तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना ‘दिवस बदलत असतात’ असा इशारा दयन आव्हान दिले. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यातही शिवसेनेची गटबाजी दिसून आली कंगना विरोधात काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कारवाईचे निवदेन देण्यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह संजय शेंडगे, शाम नळकांडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, योगीराज गाडे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुषमा पडोळे आदींचा समावेश होता.

आज नेताजी सुभाष चौकात शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बोराटे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. या आंदोलनात माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह काल पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेलेले अनेक पदाधिकारी हजर नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER