शिवसेनेत जातीपातीचे राजकारण, शिवसैनिकाचा गंभीर आरोप ; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

Chandrakant Shelke-Uddhva Thackeray.jpg

मुंबई : राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतरही शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे . शिवसेनेत (Shivsena) जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यानं याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्या .

मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेत जातीचं राजकारण केले जात असल्याचे या पत्रात शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत शेळके यांनी नमूद केले आहे .

येत्या एक ऑक्टोबरला नगर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. मात्र, यावरून आता शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर येऊ लागल्याने पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे .

चंद्रकांत शेळके (Chandrakant Shelke) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र :

नगरमध्ये आजपर्यंत दिवंगत अनिल भैया राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. त्यामुळेच नगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करून दिवंगत अनिल भैया राठोड यांना पराभूत केले होते. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. नगरची शिवसेना एक तर भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम करत आहेत. तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे, व नगरच्या शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा यापुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल,’ असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

चंद्रकांत शेळके यांनी या पत्राची प्रत शेळके यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख तसेच शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी देखील दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER