शिवसेनेला धक्का ; नगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र

NCP-BJP

मुंबई :- राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन केले. मात्र आता अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादी आणि भाजपने हातमिळवणी केली आहे .

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे रखडलेली अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूक अखेर होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही निवड प्रक्रिया लॉकडाउनमुळे रखडली होती. अखेर ऑनलाइनद्वारे ही निवड प्रक्रिया आज पार पडणार आहे.

21 ते 24 सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज वितरण करून दाखल केले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता निवडणूक विशेष सभा होणार आहे. त्यानंतर अर्जाची पडताळी होईल. पण, त्याआधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये सामना रंगला आहे. भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादीची सत्ता आली. संख्याबळ जास्त असतानाही शिवसेना मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER