मनसे नेते अभिजित पानसेंनी घेतली इंदुरीकर महाराजांची भेट

leader-abhijit-panse-met-indorikar-maharaj

अहमदनगर :- वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या इंदुरीकर महाराज यांची मनसेचे अभिजित पानसे यांनी आज भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी पानसे भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी इंदुरीकरांची बाजू घेत इंदुरीकरांनी अनेक चांगली कामं केली आहेत, ते आपण विसरणार आहोत का? असा प्रश्न विचारला आहे.

एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा सर्व स्तरांवरून निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER