शिवसेनेचाच महापौर होणार ; अहमदनगरमधील शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांचा दावा

मुंबई : अहमदनगरच्या महापौर पदाची मुदत संपत आल्याने नव्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे . शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. अहमदनगरमध्ये (Ahemadnagar mahanagrpalika) यावेळी शिवसेनेचाच (Shivsena) महापौर होणार, असा दावा करत शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.

अहमदनगरचे शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यात भेटीदरम्यान हापौरपदाच्या उमेदवारीवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे.

गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर झाला होता, मात्र यावेळी शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा पक्षाने केला आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने कोण या पदावर विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

महापौर पदाच्या उमेदवारांची नावे :

  • रोहिणी शेंडगे- शिवसेना
  • रिता भाकरे- शिवसेना
  • शीला चव्हाण- काँगेस
  • रोहिणी पागीरे- राष्ट्रवादी
  • तर भाजपकडे उमेदवार नाही

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवकांचा आकडा लागेल .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button