
अहमदनगर :- राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केले होते . त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
निलेश लंके यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे इथं पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केलं आहे. खरंतर, गेल्या अनेक वर्षापासून राणेगणसिद्धीमध्ये बिनविरोध निवडणुका पार पडतात. यामुळे यंदाही निलेश लंके यांच्या प्रयत्नांनी निवडणूक ही बिनविरोध पार पडणार आहे.
ही बातमी पण वाचा : चिंता करु नका, आमचे अजितदादा खंबीर – निलेश लंके
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला