अहमदनगर जिल्हा बँक महाविकास आघाडीकडे; पहिले अध्यक्षपद पवारांच्या शिलेदाराकडे

Sharad Pawar - Uday Shelke

अहमदनगर : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) वर्चस्व स्थापन केले आहे. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होण्याआधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक झाली. त्यानंतर सर्व संचालक बँकेच्या सभागृहात आले. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी उदय शेळके आणि माधवराव कानवडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे उदय शेळके (Uday Shelke) हे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे शिलेदार मानले जातात.

बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शेळके आणि कानवडे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेची उत्कृष्ट कारभाराची परंपरा पुढे चालविण्याचा विश्वास अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीने वर्चस्व राखलं असून अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला देण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले उदय शेळके हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात तर उपाध्यक्षपदी निवड झालेले माधवराव कानवडे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे कट्टर समर्थक मानले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER