भाजपाला झटका : मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीत प्रवेश !

BJP & NCP

मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीपूर्वी राजकीय भूकंप झाला आहे. सभापतिपदासाठी रिंगणात असणारे भाजपचे (BJP) नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कोतकरांच्या पक्षांतरामागे जगताप यांची खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे .स्थायी समिती सभापतीच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

स्थायी समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली असतानाच भाजपाचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला .राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोतकरांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER