अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसचे आज उद्घाटन

१९ जानेवारीपासून प्रवास करता येणार

Tejas Express

ट्रेनमध्ये विमानाच्या प्रवासाचा अनुभव देणारी तेजस ट्रेन, आता अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावण्यास सज्ज झाला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज देशातील दुसरे कॉर्पोरेट ट्रेन तेजस आज गुजरातच्या अहमदाबादहून रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते रवाना होणार आहे. ट्रेनच्या प्रत्येक सीटच्या मागील बाजूस एक एलईडी स्क्रीनसह वायफाय सुविधा देखील आहे. तेजस एक्स्प्रेस भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचे मिश्रित प्रकार आहे जे प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करेल. त्याचा वेग ताशी 160 किलोमीटर आहे. सर्वसामान्यांना १९ जानेवारीपासून या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

तेजसची उत्तम छायाचित्रे पहा.