अहमद पटेल यांच जाण्यानं मला 2 धक्के बसले – उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray - Ahmed Patel

मुंबई : काँग्रेसचे (Congress) दिवगंत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या जाण्यानं काँग्रेसचा चाणक्य गेला,त्यांच्या जाण्याने मला दोन धक्के बसले, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली. अहमद पटेल यांनी काँग्रेससाठी पदाची अपेक्षा न करता वाहून घेतले होते. पटेलांसारख्या दिग्गज नेत्याच्या जाण्यामुळं काँग्रेसचं मोठ नुकसान झालं आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचे योगदान होते. त्यांच्या जाण्यानं मविआचेही नुकसान झालंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी यावेळी अहमद पटेल यांच्यासोबतच्या संबंधावर भाष्य केले. अहमद पटेल यांच जाण्यानं मला 2 धक्के बसले आहेत. ‘अहमद पटेलांविषयी माझ्याकडे असे काही किस्से नाहीत. मात्र, त्यांची कारकीर्द ही अहमदभाई काँग्रेस नेते म्हणून आणि मी सेना नेता म्हणून अशी राहिली, आम्ही विरोधात होतो. काँग्रेस आणि सेना एकत्र येते, राजकीय नाते पुढे जाते आणि अचानक राजकीय आघात होतो, हे दुःखदायक आहे. बऱ्याच वेळा काँग्रेस डावपेच करायचे आणि आम्ही शोध लावायचो त्यावेळी कळायचे की यामागे अहमदभाई आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अहमद पटेल यांची माझी फार पूर्वी एकदा भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की ऐसे होगा तो आगे कैसे होगा. मात्र, यातून अहमदभाईंनी मार्ग काढला.” उद्धव ठाकरेंनी अहमद पटेल यांच्याविषयी आणखी एक आठवण सांगितली.”एकदा मी घरी पोहोचलो होतो, रात्रीचे 12.15 वाजले होते, त्यांच्याकडून फोन करण्यास सांगितले होतं. मी उशिरा फोन केला तेव्हा सांगण्यात आलं की ते झोपले आहेत. तुम्ही रात्री 2 ते 2.30 दरम्यान फोन करा त्यांची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा मला कळलं की ते कामाच्या बाबतीत किती तत्पर आहेत.

घड्याळ न बघता काम करणारे असे ते नेते होते. अहमद पटेल यांच्या सारखी काम करणारी माणसं शोधून सापडणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी बनवताना अहमद पटेल यांनी चिंता करु नका म्हणून सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अहमद पटेल अनेकदा सरकार कसे चाललेय, ही विचारणा करण्यासाठी फोन करायचे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीचं मोठ नुकसान झालेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER