राष्ट्रवादीकडून नागपुरात स्वबळाची तयारी, अहिरकर यांना सोपवली मोठी जबाबदारी

Anil Ahirkar - Jayant Patil - NCP
Anil Ahirkar - Jayant Patil - NCP

मुंबई :- महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष स्वबळाची तयारी करीत असून, लसीकरण केंद्राच्या माध्यमातून नगरसेवकांनी प्रचार सुरू केला आहे. राज्यात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) असल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

ही बातमी पण वाचा : …तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल  ; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली चिंता 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर (Anil Ahirkar) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली होती. काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर आज मात्र त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आज जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रदेश उपाध्यक्ष्यपदी हिरकर यांची नियुक्ती केली आहे. नागपूर (Nagpur) महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढता यावी यासाठीच पक्षाने ही उलथापालथ घडवून आणली असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपुरात उपाध्यक्षपद देण्यात आल्याने पक्षसंघटना मजबूत करण्याला भर दिला जाणार आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होण्याची अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button