अहिल्यादेवी आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक – शरद पवार

Ahilya Devi is the symbol of female power of today's generation - Sharad Pawar

पुणे :- राजमाता अहिल्यादेवी (Ahilya Devi)यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावरून राज्यातील राजकारण तापले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजमाता अहिल्यादेवींसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना जातीजातीमध्ये विभागले जात आहे, हे दुर्दैवी आहे. बहुजनांना एकाच छत्राखाली आणून जातीयवाद नष्ट करण्याची गरज आहे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

पवार म्हणाले, अहिल्यादेवी आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत. त्यांनी सत्तेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांच्याच आदर्शानुसार आपण महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. देश, समाज पुढे न्यायचा असेल तर महिलांना सहभागी करून घ्यायलाच हवे. असे पवार यांनी यावेळी सांगितले.

मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच, गडाच्या पायथ्याशी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच्या लोकार्पणप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. संभाजीराजे तर, होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तर, एका महान राजमातेच्या वंशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, असे यशवंतराजे म्हणाले.

तर दिल्लीची गादीही हस्तगत करू –

धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो. असा प्रस्ताव माजी मंत्री आणि रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यापुढे ठेवला.

ही बातमी पण वाचा : गोपीचंद पडळकरांना आसमान दाखवण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा वापरलं जुनं शस्त्र!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER