अहान शेट्टीने पूर्ण केले ‘तडप’चे शूटिंग पूर्ण

Ahan Shetty completes shooting of Tadap

प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) मुलगा अहान शेट्टीही (Ahaan Shetty) आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. प्रख्यात निर्माता साजिद नाडियाडवालाच (Sajid Nadianwala) अहान शेट्टीला नायक म्हणून पडद्यावर आणत आहे. सुनील शेट्टीचा मित्र आणि बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता अक्षयकुमारनेच (Akshay Kumar) काही दिवसांपूर्वी अहानच्या पहिल्या सिनेमाचे ‘तडप’चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करीत अहानला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूडमधील सगळ्यांनीच अहानला शुभेच्छा दिल्या होत्या. सुनील शेट्टीच्या मुलीने अथिया शेट्टीने (Athiya Shetty) अगोदरच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे आणि आता अहानही येत आहे. अहानने त्याच्या या पहिल्या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे.

अहान पिता सुनील शेट्टीप्रमाणेच बलदंड शरीरयष्टीचा दिसत असून त्याच्या तडप सिनेमाचे पहिले पोस्टर खूपच आकर्षक आणि लक्ष वेधणारे होते. अहानचा हा सिनेमा साऊथमधील तेलुगु भाषेतील सुपरहिट सिनेमा ‘आरएक्स 100’ (‘RX100’) ची हिंदी रिमेक आहे. गेल्या तीन वर्षांपासून या सिनेमाचे काम सुरु होते. खरे तर गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज केला जाणार होता, पण कोरोनामुळे या सिनेमाचेही काम पूर्ण होऊ शकले नव्हते. अहानची नायिका म्हणून तारा सुतारिया या सिनेमात दिसणार आहे. ‘तडप’चे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती स्वतः अहाननेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो टाकून दिली आहे. या फोटोत अहान दिग्दर्शक मिलन लुथरियासोबत दिसत असून दोघे एकमेकांना शूटिंग पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा देताना दिसत आहेत. या फोटोसोबत अहानने, ‘हा माझ्या पहिल्या सिनेमाचा रॅपअप आहे. या आठवणी मी नेहमीच लक्षात ठेवेन. ‘तडप’च्या संपूर्ण टीमचे आभार आणि त्या प्रत्येक व्यक्तीचेही आभार ज्याने मला काम करण्यास प्रोत्साहित केले.’ अहानचा हा पहिला सिनेमा यावर्षी 24 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अहानने सोशल मीडियावर सिनेमाचे एक पोस्टर शेअर करीत रिलीजची डेट घोषित केली होती. या पोस्टरसोबत अहानने म्हटले होते, ‘तो धोकादायक आहे, तो विद्रोही आहे आणि तो एक प्रेमीही आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER