अहाळीव- ताकद वाढविणारे छोटेसे बीज !

अहाळीव

लॉकडाऊनमधे (Lockdown) एक खूप मोठा सामाजिक बदल बऱ्याच जणांनी अनुभवला असेल की सोशल मिडीयावर एक ट्रेन्ड सुरु होतो आणि सर्वजण त्याला अनुकरण करायला सुरु करतात. खादाडगिरी विषयी तर खूप अनुभवायला आले असेल. घरच्या घरी टूटीफ्रुटी, केक, dolgana coffee असे किती तरी ट्रेन्ड या दरम्यान आले अनेकांनी बनविले सोशल मिडीयावर (Social Media) शेअर केले. तसाच एक ट्रेन्ड वाचायला मिळाला अहाळीव लाडू. कुणी पाककौशल्य असल्याने स्वतः बनविले कुणी मागविले.अहाळीवाचे महत्त्व, कसे सर्वांनी घ्यायलाच हवे याची माहिती दिली गेली. आयुर्वेदात

अहाळिवाविषयी (Ahaliv) काही माहीती आहे का ते बघूया –

  • आयुर्वेदात (Ayurveda) अहाळीवाला चन्द्रशूर म्हटले आहे. याचे भाजीसारखे क्षुप असते. चक्राकार लटकलेल्या शेंगा लागतात. या वनस्पतीचे बीज लाल टोकदार आणि पाण्यात भिजविल्यावर बुळबुळीत चिकट होतात. औषधी प्रयोगाकरीता या चंद्रशूर वनस्पतीचे बीज उपयोगात आणतात. जे अहाळीव म्हणून बाजारात मिळते व ज्याचा उपयोग लाडू खीर इ. साठी आपण करतो.
  • अहाळीव हे गरम म्हणजे उष्ण प्रकृतीचे असतात. कडू थोडे तिखट चवीचे हे बीज शरीरातील कफ आणि वाताचे शमन करतात.
  • अहाळीव वाटून त्याचा लेप संधिवात, कंबरदुखी अशा वात विकारावर करतात. आहाळीवाचा लेप वेदना कमी करणारा असल्यामुळे या विकारांवर फायदेशीर ठरतो.
  • अहाळीव बीज जंतु कमी करणारा आहे त्वचाविकारावर याचा लेप लावतात.
  • अहाळीव बीज रक्तशुद्धी करणारे आहे म्हणूनच रक्त विकार दूर करणारे त्वचेचा वर्ण चांगला करणारे आहे.
  • अहाळीव बीज दुर्बलता दूर करणारे आहे.
  • वृष्य असल्याने शुक्रधातु वृद्धी करणारे आहे. शुक्र दौर्बल्य दूर करणारे आहे.
  • आर्तव म्हणजेच मासिक स्राव चांगला येण्याकरीता अहाळीव उपयोगी आहे. कष्टार्तव म्हणजे पोट दुखणे कंबर दुखी ज्वर असा त्रास होत असेल, कष्टपूर्वक मासिक स्राव होत असेल तर अहाळीव उपयुक्त आहे.
  • अहाळीव स्तन्य वृध्दिकर तसेच वात कमी करणारे आहे. म्हणूनच प्रसुतीनंतर बाळंतीणीला अहाळीवाचे लाडू खीर देतात. आईचे दूध वाढणे तसेच शरीरात वाढलेला वात कमी होणे हे फायदे अहाळीवाने होतात. प्रसुतीनंतर आलेला अशक्तपणा दूर होतो. उष्णवीर्याचे गरम प्रकृतीचे असल्याने गर्भाशय शुद्ध होते.
  • अहाळीव उष्ण प्रवृत्तीचे असल्याने थंड ऋतुत हिवाळ्यात खाणे फायदेशीर आहे. शरीराकरीता खूप उपयोगी आहे पण हे पूर्णान्न नाही हे देखील लक्षात असले पाहिजे.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER