कृषी कायदा केंद्राला मागे घ्यावाच लागेल – शरद पवार

Sharad Pawar

दिल्ली :- केंद्रीय कृषी कायदा मागे घ्यावा लागेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा व्यक्त केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणाले की, कृषी कायदा लोकसभेत मंजूर करण्याची घाई करण्यात आली.

त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार, अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी प्रसारमाध्यमांनाच जबाबदार ठरवले. म्हणालेत, त्यात तथ्य नाही.

तुम्हीच त्या बातम्या दिल्या! भाजपाचे (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शेतकरी आंदोलनाबाबत प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्याबाबत पवार म्हणालेत, दानवेसारखी माणसे काय बोलतात त्यांना किती महत्त्व  द्यायचे?

ही बातमी पण वाचा : शरद पवारांबद्दलची चर्चा काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट ;  काँग्रेस नेत्याचा आरोप   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER