कृषी विषयक विधेयके : काँग्रेसचा राज्यसभेतील गोंधळ म्हणजे पोकळ तमाशा : अतुल भातखळकर

- काँग्रेसच्या घोषणापत्रात असलेल्या विधेयकाचाच कायदा केला आहे मोदी सरकारने

atul-bhatkhalkar

मुंबई : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषी विषयक विधेयके मंजूर झाले. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आली. या विधेयकावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले – काँग्रेसच्या घोषणापत्रात असलेल्या या विधेयकांचा मोदी सरकारने आज कायद्यात आणल्यामुळे काँग्रेसने राज्यसभेत घातलेला गदारोळ हा निव्वळ द्वेषापोटी केला तमाशा आहे.

विरोधकांनी प्रचंड गदारोळ करत हे विधेयक शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरेल असा इशारा देत विरोध केला. विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. सभागृहातच नियम पुस्तिका फाडली, माईकही तोडले.

अतुल भातखळकर म्हणालेत – काँग्रेसने स्वतःच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याचे, निर्बंधमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते तोच पक्ष आज ही आश्वासने अंमलात आणणाऱ्या मोदी सरकारच्या विधेयकाला शेतकरी विरोधी ठरवतो आहे! काँग्रेसच्या घोषणापत्रात असलेल्या या विधेयकाला मोदी सरकारने आज कायद्यात आणल्यामुळे काँग्रेसने राज्यसभेत घातलेला गदारोळ हा निव्वळ द्वेषापोटी केलेला तमाशा आहे.

दरम्यान, या विधेयकावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून या कायद्यांच्या विरोधात देशभरातील २०८ शेतकरी संघटना २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करणार आहेत. किसान संघर्ष समितीचे नेते अजित नवले म्हणाले, बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारे, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारे, सरकारची जबाबदारी कमी करणारे आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारी ३ विधेयके केंद्र सरकारने मंजूर केले. त्यांचे आज कायद्यात रुपांतर झाले असे असलं तरी या कायद्यांना संबंध देशभरात प्रचंड विरोध होतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER