कृषी विधेयक शेतकऱ्याच्या विरोधात : राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : मोदी सरकारने तीन कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधयकांना राज्यसभेत मंजुरी मिळाली. हा कायदा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा आहे. हे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने हा कायदा संमत करुन चुक केल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

समाजमाध्यमावर व्यक्त होताना राजू शेट्टी म्हणाले की, यांनी राज्यसभेत मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे. सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे.

देशभरातील शेतकर्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे ? हे दिसते. कार्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळणार ? याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER