कृषी सुधारणा कायदे बंधनकारक नाहीत; लोकसभेत मोदींनी केला खुलासा

Pm Modi - Farmer protest

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांना अकारण विरोध सुरू आहे. हे कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत. त्यात कुणावरही सक्ती केलेली नाही. शेतकऱ्यांना पर्याय दिला आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत सांगितले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभाराच्या भाषणात पंतप्रधानांनी कृषी कायद्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. तीन कृषी कायद्यांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणालेत की, कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा आवश्यक आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. पण कृषी कायद्यांबद्दल जास्तीत जास्त अफवा पसरवणे सुरू आहे.

विरोधकांनी कायद्याच्या अनुषंगाने चर्चा केली असती तर बरे झाले असते. नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतरही जुन्या व्यवस्था मोडीत निघालेल्या नाहीत; ज्यांना त्या व्यवस्थांचा उपयोग करायचा आहे त्यांनी करावा. पण, नव्या कायद्यांमुळे ज्यांना जास्त फायदा होतो आहे त्यांच्या आड येऊ नये, असे आवाहन मोदींनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER