नागपुरात शेतकऱ्यांनी पेटविला धान

farmer-burnt-paddy

नागपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना धरणातील पाणी न मिळाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातही धानाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. आपल्या व्यथा शासनापुढे मांडण्यासाठी रामटेक व पारशिवनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या परिसरात धान जाळून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सहा वर्षाआधी ३८०० रुपये विकलेल्या धानाला आज ३००० ते ३२०० भावाने शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे लागलेली लागत सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे हतबल आणि संतप्त झालेल्या टेकाडी येथील भगवानदास यादव या शेतकऱ्याने आपल्या शेतात धान पिक पेटवून सरकारचा विरोधात संताप नोंदविला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मोठमोठे आश्वासन दिले आणि सत्ता मिळवली. आता मात्र सर्व काही फोल ठरत आहे. नेते संजय सत्यकार यांनी जिल्ह्यातील धानपट्ट्यात सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. अन्यथा थेट मुख्यमंत्राच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.