ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; पर्यटकांना बाहेर काढले

Taj-Mahal-Agra-India

आग्रा : आज सकाळी अज्ञात व्यक्तीने ताजमहालमध्ये ( Taj Mahal) बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून दिली. खबरदारी म्हणून लगेच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

माहिती मिळाल्यानंतर सीआयएसएफ जवानांनी पर्यटकांना बाहेर काढले. ताजमहालचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले. बॉम्बचा शोध घेणे सुरू आहे.

दरम्यान, टीव्हीच्या एका वाहिनीने ही अफवा असून बॉम्ब ठेवल्याचा फोन (Bomb-scare) करणाऱ्याची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. अजून याबाबत निश्चित माहिती नाही.

फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन फिरोजाबाद येथून एका तरुणाने केला होता, असे चौकशीत लक्षात आले. त्याची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मूळचा फिरोजाबादचा असणाऱ्या या तरुणाने फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर परिसरात खळबळ माजली होती. सर्व पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र नंतर तपासादरम्यान ही अफवा असल्याचं समोर आलं.

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आल्यानंतर पर्यटकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं होते. अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर सीआयएसएफ जवानांनी तात्काळ तिथे उपस्थित पर्यटकांना बाहेर काढलं होत. यानतंर ज्या क्रमांकावर फोन आला त्यासंबंधी तपास केला असता ही अफवा असल्याचं समोर आलं. तरुणाची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER