वीज बिलासंदर्भात पुण्यात आंदोलन; ७० लाख वीज बिल नोटिसा मागे घ्या

Agitation in Pune over electricity bill

पुणे : ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वाढीव वीज बिलाबाबत (electricity bill) दिलेला शब्द पाळावा आणि नंतरच त्यांनी ऊर्जा खाते सोडावे. अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद (Somnath Kashid) यांनी केली. पुण्यातील वाघोली येथे दुकानदार व्यापारी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. तसेच आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत राऊतांनी ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.

वीज बिलामुळे भाजप, मनसे तसेच इतर पक्षांनी सरकारला वेळोवेळी घेरले आहे. या पक्षांकडून वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे काही संघटनासुद्धा याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळातील छोट्या-मोठ्या व्यावसायिक, दुकानदारांचे वीज बिल माफ करावे. अशा मागण्या आंदोलकांनी सरकारकडे केल्या आहेत. महावितरण व ऊर्जामंत्री यांनी ७० लाख वीज बिलाच्या नोटिसा मागे घ्याव्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दरम्यान, सरकारने या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातून ई-मेलद्वारे वीज बिल गोळा करून त्यांची मंत्रालयासमोर होळी करण्यात येईल, असेही आंदोलकांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER