खत दरवाढीविरोधात घंटानाद आंदोलन करू; नाना पटोलेंचा इशारा

Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाचे संकट (Corona Crises) अद्यापही टळले नाही. असे असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. या दरवाढीविरोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा राज्यभरात घंटानाद आंदोलन (Agitation) करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

कोरोनाचे संकट असताना केंद्राने खतांच्या किंमती वाढवल्या आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येईल. हे टाळ्या-थाळ्यांचे आंदोलन नसेल. झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येईल, असे पटोले पत्रकार परिषद घेऊन यांनी सांगितले.

भाजप हा दिशाभूल करणारा पक्ष आहे. हा पक्ष खोटारडा आहे. भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौड यांना पत्र लिहून खतांच्या दरवाढीवर त्यांचे लक्ष वेधले आहे. १ हजार २०० रुपयांचे खत १ हजार ९०० रुपयांना मिळणार आहे. ही आर्थिक लूट आहे. यातून भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसल्याचे दिसून येते. भाजपने एका वर्षात पेट्रोलचे दर २५ रुपयांनी वाढवले आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली आहे.

महाराष्ट्रासाठी वेळ नाही

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. मोदींना तिकडे जायला वेळ आहे. मात्र, महाराष्ट्रात यायला वेळ नाही. नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारने शेतकऱ्यांचा  केसाने गळा कापला ; शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केला संताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button