हाँगकाँगमध्ये चीनच्या विरुद्ध आंदोलन; निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा

Agitation against China in Hong Kong

हाँगकाँग : चीनच्या वादग्रस्त ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’च्या विरोघात हाँगकाँगमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. काही निदर्शकांवर पेपर स्प्रेचाही वापर केल्याचे कळते.

लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशात होणारं हे पहिले मोथे आदोलन आहे. नागरिकांचा होणारा विरोध पाहून पोलिसांनी चीनच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची सुरक्षाही कडक केली आहे.

शुक्रवारी हाँगकाँगच्या संसदेत राष्ट्रीय सुरक्षा कायदा पारित करण्यात आला. हाँगकाँगवरची पकड अधिक बळकट करणे हा या मागील चीनचा उद्देश आहे. या कायद्याविरोधात रविवारी हजारो नागरिक काळे कपडे घालून शॉपिंग सेंटर कॉजवे बेच्या बाहेर जमले होते.

निदर्शक हाँगकाँग स्वतंत्र करा, आमच्या काळातील क्रांती, अशी घोषणा देत होते. या आंदोलनादरम्यान हाँगकाँगमधील परिचित कार्यकर्ते टेक टॅम ची यांना अटक करण्यात आली. आठ लोकांपेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याबाबत पोलिसांनी नागरिकांना सूचना केल्या होत्या पण नागरिकांनी न ऐकल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

हा कायदा चीनच्या संसदेत २८ मे रोजी पारित होण्याची शक्यता आहे. हा कायदा पारित झाल्यास सरकारला शहरात प्रमुख संस्थांमध्ये तैनाती, तसेच चीनच्या एजन्ट्सना मनमानी कारभाराप्रमाणे लोकशाहीच्या समर्थकांना अटक करण्याची सूट मिळणार आहे.

दरम्यान, हाँगकाँगचे अखेरचे ब्रिटिश गव्हर्नर क्रिस पॅटन यांनी चीनने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. “हाँगकाँगच्या नागरिकांसोबत चीनने विश्वासघात केला आहे. नवा कायदा आणून हाँगकाँगवर नियंत्रण आणण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे दिसते आहे. १९९७ मध्ये चीनसोबत करण्यात आलेल्या करारात हाँगकाँगची स्वतंत्र न्यायिक व्यवस्था असेल असे नमूद करण्यात आले होते,” असं ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER