अल्युमिनियम कॅनच्या प्रसारासाठी आगळा पुढाकार

हिंदाल्को इंडस्ट्रीज व बॉल बेव्हरेज पॅकेजिंग (इंडिया) यांचा उपक्रम

Hindalco Industries Limited

मुंबई :- अॅल्युमिनिअम बेव्हरेज कॅन्स वजनाला हलके असतात. तसेच त्यांचा पुनर्वापर करता येतो आणि ते टॅम्पर प्रूफ असतात, पेयाची चव कायम राखत हे कॅन ग्राहकांना पेयाचा उत्तम अनुभव देतात. अॅल्युमिनिअम बेव्हरेज पॅकिंगचे हे सारे फायदे लक्षात घेऊन हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड, बॉल बेव्हरेज पॅकेजिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅन-पॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी एकत्र येत एक आगळा पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत अॅल्युमिनिअम बेव्हरेजेस कॅन असोसिएशन ऑफ इंडियाची (एबीसीएआय) स्थापना झाली आहे.

व्यवसाय, पर्यावरण आणि समाजावर लक्षणीय सकारात्मक परिणाम साधणाऱ्या शाश्वत अॅल्युमिनिअम बेव्हरेज पॅकेजिंग पद्धती निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. सध्या देशात अशा प्रकारच्या कॅनचा दरडोई वापर १ आहे. पुढील ११ वर्षात अर्थात २०३० पर्यंत हा वापर ८ कॅनपर्यन्त नेण्याचा कंपनीचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

या धोरणांचा भाग म्हणून एबीसीएआय काही संशोधन हाती घेणार आहे. लॉजिस्टिक्‍स, रेफ्रिजरेशन, वॉटर आणि पॉवर कन्‍झर्वेशनमध्‍ये बेव्हरेज कॅन्सचा कसा फायदा होतो, हे यातून अभ्यासण्यात येणार आहे. बेव्हरेज पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुयोग्य पद्धती निर्माण करणे, त्या विकसित करणे आणि अंमलात आणण्यासाठी या अभ्यासाचा फायदा होईल. एबीसीएआय आता सरकार, कॉर्पोरेट्स, व्यवसाय संघटना आणि ग्राहकांसोबत सहकार्य करत अॅल्युमिनिअम बेव्हरेज पॅकेजिंगच्या आर्थिक आणि पर्यावरणीय फायद्यांच्या जनजागृतीसाठी प्रयत्न करणार आहे.

अॅल्युमिनिअम फक्त १५ ग्रॅम असले तर एखाद्या काचेच्या बरणीचे सरासरी वजन २०० ग्रॅम असते. काचेच्या बाटल्यांच्या तुलनेत एखादा ट्रक दुप्पट द्रवपदार्थ वाहून नेऊ शकतो, तेही कमी वाया जाणे आणि फुटणे टाळून. रीटेल किंवा अंतिम ग्राहकाच्या बाबतीतही, कमी जागा आणि जलद कुलिंग यामुळे ग्रीनहाऊस उत्सर्जनाचा परिणाम कमी करता येतो. पूर्णपणे पुनर्वापरयोग्य असल्याने वापरलेला कॅन अवघ्या ६० दिवसांमध्ये नवा कॅन बनून पुन्हा शेल्फवर येऊ शकतो. या सर्व फायद्यांमुळे, वेगाने वाढणाऱ्या भारतीय बेव्हरेज बाजारपेठेसाठी अॅल्युमिनिअम बेव्हरेज पॅकेजिंग हा सुयोग्य पर्याय ठरतो.