रिहाना आणि मिया खलिफाविरोधात बॉलिवूड केंद्र सरकारच्या सोबत

दोन महिन्यांपासून जास्त काळ पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात आंदोलन करीत आहेत. सुप्रीम कोर्टात (Supreme court) जेव्हा केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनकर्त्यांनी धाव घेतली तेव्हा सुप्रीम कोर्टाने सरकारने विधेयके प्रलंबित ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. केंद्र सरकारने तिन्ही विधेयक दीड वर्षांसाठी प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शेतकरी आता तिन्ही कृषी विधेयके मागे घ्यावीत या मागणीवर अडून आहेत. त्यांच्या या आंदोलनाला नक्षलवादी आणि डाव्या संघटनांनी खुला पाठिंबा दिला आहे. त्यातच आता पोर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) आणि पॉप सिंगर रिहानाने (Rihanna) ट्विट करून पाठिंबा दिला आहे. पंजाबी गायक दलजीतने रिहानाची यासाठी प्रशंसा केली आहे.

रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर काही तासातच तिचे ट्विट व्हायरल झाले. तिच्या समर्थनार्थ जसे ट्विट आले तसेच तिच्या विरोधातही आले आहेत. मात्र परदेशातील कलाकारांनी भारतीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये असा पवित्रा बॉलिवूडमधील कलाकारांनी घेतल्याचे दिसत आहे. ही आमची अंतर्गत गोष्ट आहे आणि आम्ही ती सोडवू असेच कलाकारांनी दिलेल्या उत्तरावरून दिसत आहे. रिहानाच्या ट्विटनंतर अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगन आणि करण जोहर यांनी #IndiaTogether च्या माध्यमातून केंद्र सरकारला समर्थन दिलेले आहे. एवढेच नव्हे तर परदेशी लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे म्हणजे प्रपोगेंडा असल्याचे म्हटले आहे. अभिनेता अक्षय कुमारने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांचे ट्वीट रिट्विट करीत म्हटले आहे की, सरकार शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करीत आहे. अक्षयकुमारने पुढे लिहिले आहे, ‘शेतकरी आपल्या देशाचा खूपच महत्वाचा भाग आहे. त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे म्हणून सर्वतो प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी समस्या सुटावी म्हणून सुरु असलेल्या कामाचे समर्थन केले पाहिजे. देशात फूट पाडण्याच्या कोणत्याही वक्तव्यावर लक्ष न देता समस्या कशी सुटेल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही अक्षयने म्हटले आहे.

अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक अजय देवगणनेही भारत किंवा भारताच्या नीतीबाबत कोणीही खोटा प्रचार करू नये. ही वेळ आपण सगळ्यांनी एकजुट होण्याची आहे. अभिनेता सुनील शेट्टीनेही परराष्ट्र प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांचे ट्वीट रिट्विट करीत लिहिले आहे, ‘आपण नेहमी व्यापक दृष्टिकोण ठेवला पाहिजे. याचे कारण म्हणजे अर्थसत्यापेक्षा जास्त धोकादायक काहीही नाही. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही याबाबत ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. करणने म्हटले आहे, ‘आपण सगळे एका अशांत वातावरणात आहोत. सध्याच्या वेळेची आवश्यकता आहे विवेक आणि धैर्य. प्रत्येक कोपऱ्यावर आपल्याला या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. या. आपण सगळे मिळून एक चांगला मार्ग काढण्याचे काम करू. आपले शेतकरी आपल्या देशाचा कणा आहेत. आपण कोणालाही वेगळे होऊ दिले नाही पाहिजे.

कंगना रनौतने रिहानाच्या ट्विटवर टीका करीत तिला मूर्ख म्हटले आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘या गोष्टीवर कोणीही बोलण्यास तयार नाही. कारण ते शेतकरी नसून आतंकवादी आहेत, जे भारताचे विभाजन करू इच्छित आहेत. तसे झाल्यास आतून खिळखिळ्या झालेल्या आपल्या देशावर चीन हल्ला करून कब्जा करू शकेल. आणि अमेरिकेप्रमाणे आपल्या देशालाही त्यांची कॉलनी बनवू शकेल. गपचूप बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारख्या नकली लोकांप्रमाणे आमचा देश विकू देणार नाही.

रिहानासोबतच पोर्न स्टार मियां खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे. कंगनाने मियां खलिफाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने मिया खलिफाचे न्यूड फोटो शेअर करीत तिच्यावर चांगलेच शाब्दिक वार केले आहेत. अमेरिकन पोर्न स्टार आता भारताच्या अंतर्गत गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. गप्प बसा मूर्खांनो असेही कंगनाने म्हटले आहे. कंगनाने पुढे म्हटले आहे, एका अमेरिकन पोर्न स्टारने पैसे घेऊन प्रतिक्रिया दिल्यानेन ही लिबरल लोकं उड्या मारू लागली आहेत. मी तुम्हाला सांगते 99 टक्के भारतियांना ही गोष्ट आवडलेली नाही. अमेरिकेच्या स्वार्थी आणि मनी माईंडेड समाजाला भारतीय कधीही महत्व देत नाहीत असेही कंगनाने म्हटले आहे.

कंगनाच्या उत्तरांना सोशल मीडियावरील प्रख्यात मिमिक्री आर्टिस्ट सलोनी गौर उर्फ नजमा अप्पीने व्यंग्य केले आहे. सलोनीने कंगनाची मिमिक्री करीत असते. सलोनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर वर ट्वीट करीत, ‘बिचारी कंगना एकटी कोणा-कोणाला उत्तर देईल. बस करा अमेरिकनानो. असे म्हटले आहे. आता कंगना सलोनीला काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER