अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्धची  ‘चॅप्टर केस’ पोलिसांनी बंद केली

Arnav Goswami

मुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे (Republic TV) प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) यांच्याविरुद्ध दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १०८ नुसार सुरु करण्यात आलेली ‘चॅप्टर केस’ची (chapter case) कारवाई, सहा महिन्यांच्या ठराविक मुदतीत चौकशी पूर्ण न करता आल्याने, पोलिसांनी बंद केली आहे.

शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस समाजकंटकांविरुद्ध अशी ‘चॅप्टर केस’ची कारवाई करू शकतात. मात्र याची चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे त्यांच्यावर बंधन आहे. अशा प्रकरणात पोलीस संबंधित व्यक्तीकडून सद्वर्तनाचा ‘बॉण्ड’ लिहून घेतात.

आपल्याविरुद्धच्या प्रकरणात चौकशी सहा महिन्यांत पूर्ण झालेली नसल्याने ते बंद करावे, असा अर्ज गोस्वामी यांनी केला होता. वरळी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी तो अर्ज मंजूर करून गोस्वामी यांच्याविरुद्धची प्रस्तावित कारवाई बंद केली.

पोलिसांनी गेल्या वर्षी १० आॅक्टोबर रोजी गोस्वामी यांना या प्रस्तावित कारवाईची ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली होती. पालघर जिल्ह्यात दोन साधूंना जमावाने मारहाण करून ठार मारणे आणि देशव्यापी ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यानंतर गावी परतू इच्छिणाºया स्थलांतरित मजुरांचा मोठा जमाव बांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर जमणे या दोन घटनांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’वरून केल्या गेलेल्या वृत्तांकनावरून ही नोटीस देण्यात आली होती. गोस्वामी यांनी या दो़न्ही घटनांना निष्कारण सांप्रदायिक रंग देऊन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव वाढविला, असा पोलिसांचा आरोप होता.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button