‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सिनेमात काम केल्यानंतर सिनेमातील कलाकारांचे झाले ब्रेकअप

Zindagi Na Milegi Dobara

बॉलिवुडमध्ये (Bollywood) कधी कोणी काय कसे शोधून काढेल याबाबत कोणीही कल्पनाही करू शकत नाही. एखादा सिनेमा, एखादे दृश्य, एखादा कलाकार यांच्याबाबत अशा काही बातम्या व्हायरल केल्या जातात की त्या वाचल्यानंतर आपल्या मनातही असे असू शकेल किंवा होऊ शकेल असे भाव निर्माण होतात. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या आणि आजही प्रेक्षकांचा आवडता सिनेमा असलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara) सिनेमाबाबत एक मनोरंजक माहिती समोर आली आहे. या सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ब्रेकअप झाले आहे. ही गोष्ट आणि कलाकारांच्या नावाची यादी वाचून तुम्हीही म्हणाल. अरेच्चा खरेच आहे की.

ऋतिक रोशन (Hritik Roshan), फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अभय देओल (Abhay Deol) हे या सिनेमातील तीन नायक होते. सिनेमा रिलीज झाल्यानंतर या तिघांचेही ब्रेक अप झाले. एवढेच नव्हे तर कॅटरीना कैफ आणि कल्की कोचलिनचाही ब्रेकअप झाला.

सिनेमात फक्त कामावर लक्ष देणाऱ्या तरुणाची भूमिका ऋतिक रोशनने साकारली होती. मात्र मित्रांच्या आग्रहावरून तो पिकनिकला जातो तेव्हा त्याला खऱ्या आयुष्याची ओळख होते. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझानमध्ये ब्रेकअप झाला. दोघे अजूनही वेगळे राहातात. मात्र कधी कधी एकत्रही पिकनिकला गेलेले दिसतात.

या सिनेमात फरहानने रंगीन आणि जीवनाचा पूर्णपणे आनंद घेणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर फरहानने लग्नाला 15 वर्ष झालेली असतानाही पत्नी अधूनासोबत घटस्फोट घेतला. सध्या फरहान शिबानी दांडेकरसोबत लिव्ह इनमध्ये राहात आहे.

कॅटरीनाने (Katrina Kaif) सिनेमा ऋतिकच्या नायिकेची भूमिका साकारली आहे. त्यावेळी रणबीर कपूर आणि कॅटरीनामध्ये इलू इलू सुरु होते. सिनेमा रिलीज झाला आणि कॅटरीना आणि रणबीरमध्ये ब्रेकअप झाला.

अभय देओलने या सिनेमात लग्नासाठी आपल्या मैत्रीणीलाच प्रपोज केल्याचे दाखवण्यात आले होते. खरे तर त्याला त्या मुलीशी लग्न करायचे नसते पण केवळ चुकून प्रपोज केल्याने त्याला लग्न करावे लागते. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभय आणि त्याची प्रेयसी प्रीती देसाई यांच्यात काही कारणामुळे ब्रेकअप झाला. चार वर्ष दोघे लिव्ह इनमध्ये राहात होते.

कल्की कोचलीननेही (Kalki Koechlin) सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. सिनेमाचे काम सुरु असतानाच कल्की आणि प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. परंतु सिनेमा रिलीज झाल्याच्या काही काळानंतर कल्की आणि अनुरागने घटस्फोट घेतला.

हे वाचल्यावर तुम्हालाही नक्कीच वाटेल की, खरोखरच हा सिनेमा यातील कलाकारांसाठी अनलकी होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER