बाबरी मशीद खटला : ३० सप्टेंबरला निकाल येण्याची शक्यता

Babri Masjid Demolition Case - LK Advani - Murli Manohar Joshi

नवी दिल्ली : बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्याप्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लखनौच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.  ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

“मिस्टर सुरेंद्रकुमार यादव यांचा रिपोर्ट वाचला. निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही एक महिन्याची ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची मुदत देत आहोत. ” असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी सीबीआय (CBI) न्यायालयाला ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.

या प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani), उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER