सलग तीन पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज फॉर्ममध्ये परतली, पंजाबला १० गडी राखून पराभूत केले

CSK-Kings IX Punjab -IPL 2020

दुबई येथे रविवारी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020)च्या १८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) दहा गडी राखून पराभव करत जुन्या रंगात पुनरागमन केले. पंजाबच्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केल्यानंतर चेन्नई संघाने १४ चेंडू शिल्लक असताना विजय मिळविला. चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन आणि फैफ डुप्लेसी यांच्यात पहिल्या विकेटसाठी १८१ धावांची अखंड भागीदारी झाली.

तत्पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजय मिळवण्यासाठी १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबने निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १७८ धावा केल्या.

पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक ५२ चेंडूंमध्ये ६३ धावांचे योगदान दिले. यावेळी त्याने ७ चौकार आणि १ षटकारही लगावला. लोकेश व्यतिरिक्त निकोलस पूरनने १७ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्याचवेळी मयंक अग्रवालने १९ चेंडूत २६ धावा केल्या तर मनदीप सिंगने १६ चेंडूत २७ धावा केल्या. शार्दुल ठाकूर चेन्नईचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या चार षटकांत ३९ धावा देऊन दोन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय रवींद्र जडेजा आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

आयपीएल २०२० (IPL 2020) मध्ये चेन्नईने आतापर्यंत चारपैकी तीन सामने गमावले आहेत. उद्घाटन सामन्यात चेन्नईचा एकमेव विजय मुंबई इंडियन्सविरूद्ध होता. तो सध्या गुणतालिकेत खाली आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाबलाही पहिल्या चारपैकी तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे, परंतु रन रेटच्या बाबतीत ते चेन्नईच्या वरच्या स्थानावर आहेत.

चेन्नई सुपरकिंग्जने १७.४ षटकांच्या अखेरीस कोणताही गडी न गमावता १८१ धावा केल्या आणि त्यामुळे पंजाबचा १० गडी राखून पराभव झाला. चेन्नईकडून शेन वॉटसन ५३ चेंडूत ८३ आणि फाफ डुप्लीसीने ५३ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या दोन खेळाडूंमधील पहिल्या विकेटसाठी १०६ चेंडूत नाबाद १८१ धावांची भागीदारी करून चेन्नईने विजय कथा लिहिली.

ही बातमी पण वाचा :इरफान व हरभजन यांनी न बोलताच धोनीवर साधला निशाणा..!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER