मे महिन्यात ‘या’ तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग; चंद्रकांत पाटलांचा दावा

Chandrakant Patil

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यानंतर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या भवितव्यावर भाष्य केले. सरकार पडणार आहे, हे आठव्या  वर्गातील मुलगाही सांगू शकतो, असे विधान पाटील यांनी केले. कोरोना नियंत्रणाबाबत सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसत नाही. यामुळे निर्णय प्रक्रिया थांबली आहे. या स्थितीत हे सरकार फार काळ टिकणार नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले, पण शरद पवार यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केले. वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टी माहीतच नाहीत. स्वत: पीपीई किट घालून फिल्डवर उतरल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाहीत, असा निशाणा पाटील यांनी साधला.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांंना जितेंद्र आव्हाडांचा टोला, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button