भाजपचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीच्या प्रचारात

NCP - Jaisingrao Gaikwad

औरंगाबाद :- पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली. पदवीधर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) यांनी थेट पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केले.

आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. ‘भारतीय जनता पक्षानं मला अनेक डागण्या दिल्या आहेत. आता मला भाजपला पाडायचं आहे. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. मागच्या १३ वर्षांपासून मला कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. पक्षात मागूनही काम मिळत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, हा अर्ज मागे घेत त्यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप सोडल्यानंतर गायकवाड पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) प्रवेशाबाबत आताच काही सांगणार नाही. आता मला भाजपला पाडायचं आहे. उद्यापासून सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मराठवाडा दौरा सुरू करणार आहे.’ अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे आधीच बंडखोरी आणि नाराजीचा सामना करणाऱ्या भाजपासमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे.

ही बातमी पण वाचा : पालघर हत्याकांडाविरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यापूर्वी राम कदम पोलिसांच्या ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER