खऱ्या माहितीनंतर कृषी कायद्यांबाबत शरद पवारही त्यांची भूमिका बदलतील – तोमर

Sharad Pawar - Narendra Singh Tomar

दिल्ली : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मोदी सरकारने (Modi Government) आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि ते (पवार) कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलना करून केंद्राच्या कायद्यांवर टीका केली होती. यावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) म्हणालेत की, मला वाटते की त्यांच्याकडे चुकीची माहिती होती. मात्र, आता त्यांच्याकडे खरी माहिती आहे. मला आशा आहे की ते आपली भूमिका बदलतील आणि शेतकऱ्यांना नव्या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील.

तोमर म्हणाले, “शरद पवार हे अनुभवी राजकीय नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील प्रश्नांची आणि त्यावरील तोडग्याची चांगली जाण आहे. त्यांनी स्वतः कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले आहेत. मला वाटलं होतं की त्यांच्याकडे तथ्यांबाबत चुकीची माहिती होती. मात्र, आता त्यांच्याकडे खरी माहिती आहे. मला आशा आहे की ते आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील.”

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करुन देतात. शेतकऱ्यांच्या राज्याबाहेरही त्यांना माल विकता येणार आहे. त्यांना चांगली किंमत मिळेल. शिवाय याचा सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. नव्या कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. उलट यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामध्ये दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असे तोमर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER