पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर काँग्रेस अस्वस्थ, वरिष्ठ नेत्याने दिला इशारा

Sonia Gandhi And Sharad Pawar

मुंबई : काँग्रेसचे भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress ) अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसला सावध होण्याचा इशारा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी भिवंडी-निजामपूर नगरपालिकेच्या 18 काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिला. देशमुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुलं पत्र लिहून सावध होण्याचा इशारा दिला आहे.

भिवंडी-निजामपूर नगरपालिकेतील काँग्रसच्या उपमहापौरांसह 18 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटिल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या पत्रात म्हणाले की, हे प्रकरण सावध होण्यासारखं आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. काँग्रेस पक्षाने केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक होऊन आणि सरकारमध्ये मंत्रिपद घेऊन समाधानी व्हायला नको.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे, पण काँग्रेस देखील आक्रमक आहे. राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेसोबत समन्वय करण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात सहभागी करुन घेण्यात आलं. हा केवळ योगायोग नाही, असं मत विनायक देशमुख यांनी व्यक्त केलं.

याआधी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. मात्र, नंतर ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. यानंतर मित्रपक्ष आपआपसात पक्षांतर करण्यावर नियंत्रण ठेवतील असं ठरलं होतं, तर मग काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत कसे गेले? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने समन्वय समितीतील आपल्या मित्रपक्षांकडे याबाबत उत्तर मागितलं पाहिजे. अन्यथा सत्ताधारी आघाडीत सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचंच होईल. दुसरीकडे शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, काँग्रेसचे नगरसेवक पक्षातील स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे पक्ष सोडून गेलेत. ते आमच्याकडे आले होते, मात्र आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवेश दिला नसता तर ते भाजपमध्ये गेले असते.

ही बातमी पण वाचा : ‘विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’, शिवसेनेची काँग्रेसवर खोचक टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER