मनसेच्या चर्चेनंतर बजाज फायनान्सचा आटोरिक्षाचालकांना दिलासा

- सुमारे ४७ कोटींची होणार बचत

Mns-Bajaj Finance

मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात केंद्र व राज्य सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या आटोरिक्षाचालकांना कोणताही आर्थिक दिलासा दिला नाही. याबाबत मनेसेचे (MNS) संजय नाईक (Sanjay Naik), कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी बजाज फायनान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बजाज फायनान्सने आटोरिक्षाच्या कर्जाबाबत सवलती देण्याचे मान्य केले. यामुळे आटोरिक्षाच्या कर्जात सुमारे ४७ कोटींची सवलत मिळण्याची शक्यता आहे.

संजय नाईक व कीर्तिकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १,१९,७४३ लोकांनी आटोरिक्षासाठी कर्ज घेतले आहे. कोरोना टाळेबंदीत पाच महिने रिक्षाचालकांचे उत्पन्न बंद होते. मात्र, बजाज फायनान्स कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी दबाव टाकत आहे, अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या. यासंदर्भात बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य व्हावे, यासाठी मनसेने आधी बजाज कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि नंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला होता. नंतर चर्चेतून तोडगा निघाला. यातून राज्यातील १,१९,७४३ रिक्षा मालकांची प्रत्येकी किमान रु ३,२०० ते जास्तीत जास्त रु ४,००० रुपये बचत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER