लॉकडाऊननंतर विराट कोहलीचे लक्ष असणार सचिनच्या विक्रमांवर !

सचिन तेंडुलकरची बहुतेक विक्रम जर कोणी मोडू शकनार असेल तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

Cricket

कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत सुरू होईल तेव्हा रेकॉर्ड्सचा  बादशाह सचिन तेंडुलकर याचे काही रेकॉर्ड्स भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नोंदवल्या जाऊ शकतात.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे, ज्यात कोहली (७० शतक) अजूनही खूप मागे आहे; परंतु मास्टर ब्लास्टरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांपासून तो जास्त दूर नाही. जर क्रिकेट सामने सुरळीत चालले तर पुढच्या वर्षी विराट कोहली आपल्या नावावर हा विक्रम करू शकतो.

एकदिवसीय सामन्यात कोहलीने नुकतीच ४३ शतके केली असून तेंडुलकरशी बरोबरी करण्यासाठी त्याला केवळ सहा शतकांची आवश्यकता आहे. तथापि, सचिनच्या भारतीय भूमीवरील एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी कोहलीला केवळ एका शतकाची गरज आहे. सचिनने घरच्या मैदानावर २० तर कोहलीने १९ शतके केली आहेत.

सामन्यांच्या पुनरागमनानंतर सचिनच्या  ज्या एकदिवसीय विक्रमाला कोहली सर्वांत पहिले मोडू शकतो तो आहे सर्वांत कमी डावात १२,००० धावा पूर्ण केल्याचा एकदिवसीय विक्रम आहे. सचिनने ३०० तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने ३१४ डावांत हे स्थान मिळवले. कोहलीने आतापर्यंत २४८ सामन्यांच्या २३९ डावांत ११,८६७ धावा केल्या आहेत आणि १२,००० चा आकडा पूर्ण करण्यापासून फक्त १३३ धावा मागे आहे. महत्त्वाचे म्हणजे एकदिवसीय सामन्यात सर्वांत  कमी डावात ८०००, ९०००, १०,००० आणि ११,००० धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. त्याने १०,००० आणि ११,००० धावांच्या बाबतीत सचिनचा विक्रम मोडला.

भारतीय संघ चार  कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर गेला तर कोहली कांगारूंच्या देशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके ठोकणारा भारतीय फलंदाज बनू शकेल. सचिनने आणि कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सहा-सहा शतके ठोकली आहेत. तेंडुलकरच्या नावावर या देशात २० सामन्यांच्या ३८ डावांमध्ये १८०९ धावा नोंदल्या गेल्या आहेत, तर कोहलीने १२ कसोटी सामन्यांच्या २३ डावांत  १२७४ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे कोहली ५३५ धावांनी तेंडुलकरच्या मागे आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER