राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार : राज ठाकरे

Raj Thackeray-Bhagat Singh Koshyari.jpg

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (29 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली . या भेटीत वाढीव वीज बिलासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे . तसेच राज्यपालांच्या भेटीनंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray) यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली .

राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला .

राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली.

लॉकडाउनच्या काळात आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक संघटनांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यातील अनेक मुद्दे राज ठाकरे राज्यपालांसमोर मांडणार असल्याची चर्चा होती .

दम्यान राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले आहे. राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी 9 वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बैठकीसाठी बोलवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER