पहिल्याच चित्रपटानंतर सोहेल खानने केले होते पळून लग्न; असे आहे पत्नी सीमाशी नाते

Sohail Khan & Seema

बॉलिवूडचा दबंग म्हणजे सलमान खान लाइम लाईटमध्ये राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यही याच मथळ्यांमध्ये राहतात. अरबाज खान आणि सोहेल खान हे सलमान खानचे दोन भाऊ आहेत. हे तीन भाऊ लुकच्या बाबतीत इंडस्ट्रीतील सर्व नायकांना कडक स्पर्धा देतात. पण आज आपण सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानबद्दल बोलू. २० डिसेंबर १९७० रोजी सोहेल खानचा जन्म झाला. सोहेल यंदा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. या खास दिवशी आपण सोहेल खानच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया …सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले; पण यशस्वी होऊ शकला नाही. सोहेलने सलमानबरोबर काही चित्रपटातही काम केले होते.

ते चित्रपट फक्त सलमानच्या नावानेच चालू शकले. आता सोहेल केवळ अभिनयापासून दूर चित्रपट निर्मिती करत आहे. त्याचबरोबर तो काही टीव्ही रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून दिसला आहे. सोहेल खानने १९९७ मध्ये दिग्दर्शक म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाच्या वेळी सोहेलची सीमा सचदेवशी भेट झाली. सीमा दिल्लीची रहिवासी होती; पण फॅशन डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला गेली. इथेच सीमा आणि सोहेल पहिल्यांदा भेटले. सोहेलने पहिल्याच भेटीत सीमाला हृदय दिले होते.

दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. दोघांनाही लवकरात लवकर लग्न करायचं होतं; पण सीमाचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. कुटुंबाचा नकार असूनही, सोहेलवर सीमाचे प्रेम कमी झाले नाही आणि दोघांनी पळून जाऊन लग्न केले. ज्या दिवशी सोहेलचा पहिला ‘प्यार किया तो डरना क्या’ रिलीज झाला त्याच दिवशी सोहेल आणि सीमा घरून पळून गेले आणि त्यांनी आर्य समाजात लग्न केले. नंतर या दोघांनीही आपापल्या धर्माचा मान राखत लग्न केले. लग्नानंतर सोहेलने सीमाबरोबर मनोरंजन व्यवसाय (Entertainment Business) सुरू केला.

सीमा टीव्ही शो आणि चित्रपटांची अग्रणी फॅशन डिझायनर (Leading Fashion Designer) बनली. सीमाचे ‘बांद्रा १९०’ नावाचे एक बुटीक आहे. ती सुझान खान आणि महेप कपूर यांच्यासोबत चालवते. याशिवाय सीमाचे मुंबईत ब्युटी स्पा आणि ‘कलिस्टा’ नावाचे सलून आहे. सीमाने टीव्ही सीरियल ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मध्ये कास्टच्या वेशभूषा (Costume) डिझाईन केले होते. या सीरियलद्वारे सीमाला ओळख मिळाली. सीमा आणि सोहेल यांना निर्वाण खान आणि योहान खान अशी दोन मुले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER