मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपाच्या नेत्यांनी केली राहुलची धुलाई

PM Modi-Rahul Gandhi

नवी दिल्ली : कोसळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी कायदे, चीनची घुसखोरी अशा अनेक मुद्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर (Video Share) करत त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजपाचे अनेक नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) तुटून पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी म्हणाले – भारतासाठी खरा धोका हा नाही की आपल्या पंतप्रधानांना समजत नाही. वास्तवात हे सांगण्याची हिंमत त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तींमध्ये नाही. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘हवेतून ऑक्सिजन आणि पाणी’ मिळवण्याची गोष्ट करत आहेत.

यानंतर भाजपायाच्या नेत्यांनी राहुल गांधींवर ट्विटचे हल्ले सुरू केले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर लिहिले – राहुल गांधींच्या जवळपासच्या नेत्यांमध्ये हे सांगण्याची हिंमत नाही की त्यांना काही कळत नाही! ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांची टर उडवतात. पण जगातील सर्वात आघाडीच्या कंपनीचे सीईओ त्यांच्या म्हणण्याशी सहमत आहेत.

भाजपा आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी तर लगेचच काही बातम्यांच्या लिंक शेअर केल्या. यामध्ये टर्बाइनने हवेतून पाणी तयार करण्याचा उल्लेख केला आहे.

डेन्मार्कची कंपनी ‘वेस्टास’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक अँडरसन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच संवाद साधला होता. त्या व्हिडिओत – ‘विंड एनर्जी टर्बाइनच्या मदतीने जिथे आर्द्रता आहे, त्या ठिकाणी हवेतून पाणी शोषून घेऊन त्यापासून पेयजल बनवण्यात आले तर ते एनर्जीचंही काम करेल आणि पाणीही मिळेल’ असे मोदी म्हणाले. या जलाने गावांतील पाण्याची समस्या दूर करण्याची इच्छाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. यावर हेन्रिक अँडरसन यांनी मी ‘पंतप्रधान यांच्या उत्कट भावनेवर हसत’ असल्याचे सांगतानाच मोदींना डेन्मार्कला येऊन इंजिनिअर्सला ही युक्ती समजावण्याचेही आमंत्रण दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER