काँग्रेस नेत्याच्या भेटीनंतर अभिनेता संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला

Nitin Gadkari - Sanjay Dutt - Maharashtra Today

नागपूर : बॉलिवूडचा सुप्रिद्ध अभिनेता संजय दत्त काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेण्यासाठी नागपुरात आले आहे . त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहे .

संजय दत्त (Sanjay Dutt) गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातच आहेत . आज सकाळी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. गडकरी यांची शनिवारी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर आज सकाळी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी माहिती समोर आली आहे .

दरम्यान शनिवारी संध्याकाळी संजय दत्त ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता. कोरोना परिस्थितीमुळे स्वागत समारंभ सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक मान्यवरांना या सोहळ्याला उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळेच संजय दत्त यांनी राऊत यांच्या कुटुंबियांचो सदिच्छा भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button