मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी वझेंबद्दलचा निर्णय बदलला, फडणवीस यांचा आरोप

Devendra fadnavis - Anil Deshmukh

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) संशयास्पद मृत्यू प्रकरणातील संशयित पोलीस अधीकारी वझेंना हटवण्याचे गृहमंत्र्यांनी (Home Minister Anil Deshmukh) अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत कबूल केले, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांशी (CM Uddhav Thackeray) झालेल्या भेटीनंतर त्यांनी निर्णय बदलला, असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणालेत की, सरकार वझेंना का पाठिशी घालते आहे? असा प्रश्न त्यांनी केला. विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर आज (मंगळवारी) ते माध्यमांशी बोलत होते. सचिन वझेला अटक झाली तर सरकारमधल्या कोणा कोणाची नावे समोर येतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सचिन वझेला पाठिशी घालत असून हा अधिकारी सभागृहापेक्षा मोठा आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER