मुख्यमंत्र्यांनंतर भाजपाच्या आमदारानेही केले रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन!

Atul Save

औरंगाबाद : औरंगाबादेत (Aurangabad) विकासकामांच्या श्रेयवादावरुन वाद होणे विशेष राहिले नाही. याच्या नव्या अंकात राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाल्यानंतर भाजपाचे (BJP) आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी पुन्हा भूमिपूजन केले!

आमदार सावे यांच्या भूमीपूजन कार्यक्रमावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. सेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे लोकाच्या लेकराला स्वत:चे नाव देण्याचा प्रकार आहे, अशी टीका केली.

निवडणुकीचे वारे

लवकरच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणावरून शिवसेना आणि मनसेनेत राजकारण तापण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

फेब्रुवारीत पाच मोठ्या महापालिकांची निवडणूक

कोरोना (Corona) संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच मोठ्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची घोषणा होणार आहे. याशिवाय, राज्यातील ९६ नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका होऊ शकतात असे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER