बिहारच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना असेल विरोधी पक्षात – रवी राणा

Ravi Rana

अमरावती :- बिहारच्या विधानसभेची निवडणूक संपली की महाराष्ट्रातले हे सरकार आपोआप पडणार असून शिवसेना (Shivsena) विरोधी पक्षात असेल, असे भाकीत अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात  केलेल्या भाषणावर राणा यांनी कडाडून टीका केली. ते म्हणालेत – विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. १० हजार रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले त्यातून महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे इंचभरदेखील भले होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी १० हजार रुपये देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

नुकसान भरपाईत शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टर व फळबागाला ५० हजार रुपये हेक्टर मदत देणे आवश्यक होते. मदतीची मर्यादा दोन हेक्टर केली. हे महाराष्ट्राचे मोठे दुर्भाग्य आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही.

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात वारंवार आवाहन दिले की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. मी सांगतो, बिहार निवडणुका झाल्या की राज्यातील सरकार आपोआप पडेल आणि शिवसेना विरोधी पक्षात बसेल, असे राणा म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारी होती – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER