स्वाभिमानी’च्या इशाऱ्यानंतर पालकमंत्री घेणार उद्या ऊस दराबाबत बैठक

Satej Patil - Swabhimani Shetkari Sanghatana

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला किती दर द्यावा, यासाठी उद्या (शनिवार) सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatana) सोमवारी (ता. 2) ऑनलाईन ऊस परिषद होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी यापूर्वीच तडजोडीचा पायंडा मोडून काढला. आपला. कारखाना सुरू ठेवला आहे, पालकमंत्री सतेज पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने विचारणा केली. यानंतर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री सतेज पाटील आज भेट घेतली. ऊस साखर कारखाने सुरु करण्याआधी उसाच दर निश्चित करावा, अशी मागणी केली. यावेळी, श्री पाटील यांनी साखर कारखान्यांच्या अध्यक्षांशी संवाद साधून उद्याची बैठक निश्चित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER