सुप्रिया सुळे यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

Praful Patel - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन येथे भेट घेतली. ही भेट जवळपास एक तास चालली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या देखील राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

राज्यपालांच्या या भेटीबद्दल स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र राज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या भेटीची माहिती देण्यात आली. तसेच जवळपास १ तास चर्चा झाल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button