‘स्त्री’नंतर आता ‘रुही’ घाबरवणार प्रेक्षकांना

Roohi

प्रख्यात निर्माता दिनेश व्हिजनने लॉकडाऊनपूर्वी स्त्री सिनेमातून प्रेक्षकांना घाबरवण्याचे काम केले होते. हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला होता त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने विक्रमी कलेक्शन केले. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत या सिनेमाने हॉरर कॉमेडी या नव्या जॉनरची प्रेक्षकांना ओळख करून दिली. लॉकडाऊनपूर्वी ‘स्त्री’ (Stree) सिनेमा देणारा निर्माता दिनेश व्हिजन ‘रुही’ (Roohi)नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमातही नायक म्हणून राजकुमार राव दिसणार असला तरी नायिका म्हणून श्रद्धाऐवजी जान्हवी कपूर दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला. ट्रेलरवरून हा सिनेमाह कॉमेडी हॉरर जॉनर पुढे नेणार असल्याचेच दिसत आहे. 11 मार्च रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.

हार्दिक मेहता दिग्दर्शित या सिनेमाचे मूळ नाव रुही अफजा ठेवण्यात आले होते. तसेच हा सिनेमा गेल्या वर्षीच रिलीज होणार होता परंतु कोरोनामुळे सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता. आता सिनेमाचे नाव बदलून फक्त ‘रुही’ करण्यात आले या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारीत आहे. हा सिनेमाही ‘रुही’ या मुख्य कॅरेक्टरच्या अवतीभोवतीच फिरताना दिसणार आहे. या रुहीला भुताने झपाटलेले असते. भूताने झपाटलेल्या या रुहीवर राजकुमार राव आणि वरुण शर्मा प्रेम करू लागतात. मात्र त्यांना लवकरच रुहीचे खरे रूप कळते. रुहीच्या शरारातील भूत उतरवण्याचे काम ते सुरु करतात. मात्र या कामात त्यांना विचित्र अनुभव येतात. ते अनुभव काय असतात, रुहीला भूतापासून मुक्ती मिळते का आणि राजकुमार राव आणि वरुणपैकी कोण तिच्याशी लग्न करते याची कथा म्हणजे हा सिनेमा आहे. जान्हवी कपूरने यात भूताने पछाडलेली आणि सामान्य मुलगी अशा दोन भूमिका साकारल्या आहेत. दोन्ही भूमिकेत जान्हवी भाव खाऊन गेली असल्याचे सांगितले जाते. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच जान्हवी यात किती यशस्वी झाली आहे ते कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER