सोलापूर, उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार!

CM Uddhav Thackeray - Solapur

मुंबई :  सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकण दौरा (Kokan Visit) करणार आहेत. यावेळी ते कोकणातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या शेतक-यांचे हाल केले आहेत. घरांची पडझड झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले. हाती आलेलं पीक पाण्यात गेलं. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते अतिवृष्टी भागात पाहणी दौ-यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. तर आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) ते उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

यानतंर आता दसऱ्यानंतर मुख्यमंत्री कोकण दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्याची रुपरेषा सध्या आखली जात आहे. “मी कोकणात येणार आहे, दसऱ्यानंतर येईल,” असे उद्धव ठाकरे स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा करताना सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्याची पाहणी करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान येत्या 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कोकण दौरा करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ही बातमी पण वाचा :मुख्यमंत्री आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर, आज तरी शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER