शरद पवारांनंतर संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना फोन

Sharad Pawar - Sanjay Raut - Mamata Banerjee - Maharashtra Today
Sharad Pawar - Sanjay Raut - Mamata Banerjee - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राजद नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. तसेच शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र मिळून काम करण्याचे संकेतही दिले. यापाठोपाठ शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दूरध्वनी करून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले.

दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने  आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button