शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस घेणार थेट एकनाथ खडसेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत .

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी करणार आहेत.

याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करतील. दरम्यान जळगाव जिल्ह्यात भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला हे बघता पक्षबांधणी संदर्भातही रक्षा खडसेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या आजी-माजी १० नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस अचानक शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button