शाहरुखनंतर आता आमिर खानही ओटीटीसाठी करणार चित्रपट निर्मिती

Aamir Khan

ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platform) वाढते प्रस्थ पाहून बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक मोठे कलाकार डिजिटल प्‍लॅटफॉर्मक़े वळलेले आहेत. शाहरुखची (Shahrukh Khan) रेड चिली (Red Chilli) कंपनी नेटफ्ल‍िक्‍ससाठी वेब शो तयार करीत आहे. प्रियांका चोप्रानेही अमेझॉनसोबत मोठा करार केला आहे. अजय देवगननेही एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत कोट्यावधींचा करार केला आहे. यात आता आमिर खानचेही (Aamir Khan) नाव जो़डले जात आहे. आमिर खानने ‘लगान’ चित्रपटाची निर्मिती करून निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्याचा हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. आणि आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. तो एक सायंस फिक्शन बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो स्वतः ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काम करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आमिर खानच्या या प्रोजेक्टबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे. या सायंस फिक्शनच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून आमिर खान रोज स्क्रिप्टिंगच्या कामाचा आढावा घेत आहे. स्क्रिप्टिंगसोबतच शूटिंगची योजनाही तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या शो चे दिग्दर्शन कपिल शर्माकडे सोपवण्यात आलेले आहे. थांबा लगेचच निष्कर्ष काढू नका. हा तो कॉमेडी वाला कपिल शर्मा नसून तो जाहिरात जगतातील एक मोठे नाव आहे. सूत्रांनी सांगितले, हा शो एक थ्रिलर आहे परंतु त्यात आधुनिक सायंसचा वापर करून कथा सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शोसाठी आमिर खान बॉलिवूडमधील मोठे स्टार घेण्याचा विचार करीत असून वरुण धवन आणि रणबीर कपूर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या दोघांनी नकार दिल्यास आयुष्‍मान खुराना आणि राजकुमार रावला घेऊनही हा शो तयार केला जाऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले.

आमिर खानचा हा प्रोजेक्ट डिस्ने प्‍लस हॉटस्‍टारसाठी तयार करण्यात येणार असून फेब्रुवारीपासून याचे शूटिंग सुरु केले जाईल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER